Saturday, February 12, 2011

लग्न

                                                               लग्न.
लग्न लग्न म्हणजे काय असत?
         त्याच्या मनातील विचारांच
         तिच्या चेहरया वरच प्रतिबिंब असत.
         तिच्या प्राश्नाआधी त्याच    
         उत्तर तयार असत.
लग्न लग्न म्हणजे काय असत?
         त्याला लागताच ठसका
         तिच्या डोळ्यात पानी तरळत.     
         तिला लागताच ठेच
         त्याच मन कळवळत.
लग्न लग्न म्हणजे काय असत?
         तिने चहा केला तरी
         त्याला सरबत हव असत
         त्याने गजरा आणला की नेमक
         तिला फूल हव असत
लग्न लग्न म्हणजे काय असत?
         त्याच्या बेफिकिरीला
         तिच्या जनिवाच कोंदन असत
         तिच्या खर्चाना त्याच्या खिश्याच आंदन असत
लग्न लग्न म्हणजे काय असत?
         त्याच्या चुकाना तिच्या पदराच पांघरून असत
         तिच्या दुखाला त्याच्या
         खांद्याच अंथरुण असत
लग्न लग्न म्हणजे काय असत?
         कधी समजोता तर
         कधी भांडन असत 
         तो चिडला तरी
         तिने शांत रहायच असत
         कपातिल वादळ
         चहा बरोबर संपवायच असत.
लग्न लग्न म्हणजे काय असत?
         कधी दोन मनांच मिलन असत
         तर कधी दोन जिवांचा भांडन असत
         एकाने विस्कटल तरी दूसरयाने आवरायच असत
         संकटाचे  वादळ दारातच थोपवायच असत
लग्न लग्न म्हणजे काय असत?
         प्रेमाच तर बंधन असत
         घराच ते घरपण असत
         विधात्याला पडलेल
         ते एक सुंदर स्वप्न असत.

Thursday, February 3, 2011

मित्र

                                                                     "मित्र"
कधी वाटत आपला ही एक मित्र असावा. ज्याने जाणून घ्यावा मला. माज्या गुण दोषां सहित ज्याने गज़वावा माज्यावर अधिकार. माज्या चुकाना ज्याने करावे रांगेत उभे. माज्या प्रत्येक वाइट कृत्याचा अधिकाराने विचारावा जाब, माज्यावर मनसोक्त रागवावे, संतापाने चिडावे, ज्याने करावी माज्या स्वप्नांशी, सुख दुखांशी ओळख . ज्याच्या खांद्या वर मान टाकुन मी मन मोकले करावे.
हा नुसता विचार ही मनाला सुखद स्पर्श देवून जातो.


ज्योति लक्ष्मण कदम.

Tuesday, February 1, 2011

प्रेम

                                                             "प्रेम"
         प्रेम हे माणसाला स्वतः पलिकडे पहायची शक्ति देते. मग ते प्रेम कोणावर ही असो, ते कशावर ही जड्लेले असो, मात्र ते खरे खुरे असायला हवे. ते स्वार्थी, लोभी असता कामा नये. खरे प्रे नेहमी निस्वार्थी असते. निस्वार्थी, निरपेक्ष आणि निरहंकारी प्रेम हीच माणसाच्या आत्म्याच्या विकासाची पहिली पायरी आहे. जीवनात प्रेम ही एक उच्च भावना आहे.
          प्रेम नेहमी हृदयाच्या भाग्यात उमललेले एक कोमल फूल आहे. प्रेमात विश्वास महत्वाचा असतो. पण त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेमात श्रद्धा असावी लागते. तेव्हाच प्रेम यशस्वी होते. 

  आपली मैत्रीण.
ज्योति लक्ष्मण कदम.

Monday, January 31, 2011

प्रस्तावना

"प्रस्तावना"

प्रिय वाचकहो,
       हा ब्लॉग सुरु करण्या मागील उद्देश्य एकच आहे की मी स्वतःच्या काही आठवणी, काही कविता, काही लेख आपल्या सोबत वाटू इचिते. तसेच आपणा सर्वांच्या आठवणी ही मी ऐकू इचिते. मला आशा आहे की आपण ह्या ब्लॉग ला उत्तम प्रतिसाद दयाल. ह्या ब्लॉग मार्फ़त  आपणा सर्वांची चांगली करमणुक होइल आणि काहीतरी नविन मिळेल अशी आशा करते.


धन्यवाद
ज्योति लक्ष्मण कदम.