"प्रेम"
प्रेम हे माणसाला स्वतः पलिकडे पहायची शक्ति देते. मग ते प्रेम कोणावर ही असो, ते कशावर ही जड्लेले असो, मात्र ते खरे खुरे असायला हवे. ते स्वार्थी, लोभी असता कामा नये. खरे प्रे नेहमी निस्वार्थी असते. निस्वार्थी, निरपेक्ष आणि निरहंकारी प्रेम हीच माणसाच्या आत्म्याच्या विकासाची पहिली पायरी आहे. जीवनात प्रेम ही एक उच्च भावना आहे.प्रेम नेहमी हृदयाच्या भाग्यात उमललेले एक कोमल फूल आहे. प्रेमात विश्वास महत्वाचा असतो. पण त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेमात श्रद्धा असावी लागते. तेव्हाच प्रेम यशस्वी होते.
आपली मैत्रीण.
ज्योति लक्ष्मण कदम.
No comments:
Post a Comment